नगरमध्ये आणखी सहा करोनाग्रस्त; दोघे 'तबलिगी'
राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा वाढतच चालला असून  अहमदनगर  जिल्ह्यात आज आणखी सहा रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील दोघे परदेशी नागरिक असून दिल्लीतील 'मरकज'मध्ये सहभागी झाले होते, अशी माहिती समोर आली आहे. नगरच्या आरोग्य विभागानं काही संशयित रुग्णांच्या घशाचे स्त्राव पुणे येथे तपासणी…
धारावीत सॅनिटाइझ करणाऱ्या कर्मचाऱ्यालाच करोना
आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतही करोनाने शिरकाव केला आहे. धारावीत करोनाचा लागोपाठ दुसरा रुग्ण आढळला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सॅनिटाइझचं काम करणाऱ्या एका सफाई कर्मचाऱ्यालाच करोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे धारावीत खळबळ उडाली आहे. धारावीत बुधवारी एका ५२ वर्षीय व्यक्…
प्रीपेड आणि पोस्टपेड प्लान ८०% महाग होण्याची शक्यता
जीएसटीचा दर १२ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवरून केल्यानंतर स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ झाली आहे. स्मार्टफोन खरेदीसाठी ग्राहकांना आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार असून ग्राहकांना आता डबल झटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  टेलिकॉम कंपन्या  आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड प्लानमध्ये ६० टक्के ते ८० टक्क्यांप…
लॉकडाऊननंतर ठरणार आयपीएलचे भवितव्य
यंदा आयपीएल होणार की नाही, याची उत्सुकता साऱ्यांनाच आहे. पण आता लॉकडाऊन संपल्यानंतरच आयपीएलबाबतचा पुढील निर्णय होणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. करोना व्हायरसमुळे भारतातील क्रीडा स्पर्धांनाही चांगलाच धक्का बसला आहे. बीसीसीआयला भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय क्रिकेट मालिका रद्द …
नगर जिल्ह्यात पेट्रोल पंप ४ तासच सुरू राहणार
करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून, नगर जिल्ह्यातील सर्व  पेट्रोल पंप  दररोज ४ तासच सुरू ठेवण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी याबाबत आदेश दिले आहेत. ३१ मार्चपर्यंत पहाटे पाच ते सकाळी नऊ या वेळेतच पेट्रोल आणि डिझेल विक्री करण्यात यावी, असे…
६००० मृत्यूंनंतर इटलीतून पहिली दिलासादायक बातमी
करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे इटलीत दररोज शेकडो मृत्यू होत आहेत. हजारो लोकांनी जीव गमावल्यानंतर इटलीला पहिला दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मृतांचा आकडा कमी झाला आहे. हा क्रम असाच सुरू राहिल्यास इटलीतील संसर्गाचा धोका कमी होत जाईल, असं जाणकारांचं म्हणणं आहे. इटलीत आतापर्यंत ६ हजारपे…