करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे इटलीत दररोज शेकडो मृत्यू होत आहेत. हजारो लोकांनी जीव गमावल्यानंतर इटलीला पहिला दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मृतांचा आकडा कमी झाला आहे. हा क्रम असाच सुरू राहिल्यास इटलीतील संसर्गाचा धोका कमी होत जाईल, असं जाणकारांचं म्हणणं आहे. इटलीत आतापर्यंत ६ हजारपेक्षा जास्त जणांचा करोनाने बळी घेतला आहे.
जगातील १९५ देशात करोनाचे रुग्ण आहेत. यात इटलीने चीनलाही मागे टाकलं. जगभरात आतापर्यंत ३ लाख ८१ हजार ५९८ लोक करोनाबाधित आहेत. यापैकी एक लाख लोकांवर उपचार करुन रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे, तर १६ हजार ५५९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. इटलीतील मृतांचा आकडा चीनपेक्षाही जास्त आहे.