करदात्यांना दिलासा; रिटर्न फायलिंगला ३० जूनपर्यंत मुदतवाढ

 करोनाला रोखण्यासाठी अनेक राज्यांमध्ये संचार बंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने करदात्यांच्यादृष्टीने आज महत्वाची घोषणा केली. विवाद से विश्वास योजना, पॅन-आधार जोडणी, जीएसटी आणि आयकर रिटर्नसाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. आता करदात्यांना ३० जूनपर्यंत रिटर्न फायलिंगसाठी अतिरिक्त वेळ मिळणार आहे. यापूर्वी ३१ मार्च ही अंतिम मुदत होती.


वर्षभरातील सर्व आर्थिक कामे पूर्ण करण्याची शेवटची मुदत ३१ मार्च २०२० होती. मात्र दोन आठवड्यात सध्या देशभर 'करोना'चा प्रादुर्भाव झाल्याने लॉकडाउनची समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आर्थिक कामे पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत वाढवून देण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज दिल्लीत केली.